27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या कालबद्ध कार्यक्रमावरुन जरांगे आक्रमक

मराठा आरक्षणाच्या कालबद्ध कार्यक्रमावरुन जरांगे आक्रमक

पुणे : मनोज जरांगे यांना लेखी टाईम बॉन्ड देण्यासाठी येणा-या शिष्टमंडळाकडून फक्त तारीख पे तारीख दिली जात असल्याचे चित्र आहे. आपण आजचं सरकारमधील काही मंर्त्यांना थेट फोन करून याबाबत जाब विचारणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर, टाईम बॉन्ड देणार की नाही याबाबत आज सरकारला शेवटचं विचारणार असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे टाईम बॉन्डवरून सरकार आणि जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. पुण्यातील खराडी भागात आज मनोज जरांगेंची सभा झाली.

मनोज जरांगे म्हणाले, १८०५ पासून १९६७ पर्यंत आणि सगळे पुरावे शोधण्याचे काम सुरू झाले आहे. ओबीसी प्रवर्गत मराठे असल्याचं समोर आले आहे. राज्यात आतापर्यंत २९लाख नोंदी सापडल्या आहेत. मग जर मराठा आरक्षणात येतो. तर ७० वर्षांपासून मराठ्यांचे कुणी वाटोळे केले याचे उत्तर द्या. आरक्षण कुणी मिळू दिल नाही त्याचे नाव आम्हाला द्या. आमचं भविष्य यांनी पूर्ण उध्वस्त केले आहे. आम्हला ७० वर्षा आधी आरक्षण दिले असते तर जगात प्रबळ जात म्हणून एक नंबरला मराठे राहिले असते. आमचा नोकरीतला टक्का घसरला आणि ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आमच्यावर आली.

आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला पाहिजे
मराठा आरक्षणची लढाई खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेकांनी टोकाची झुंज दिली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत सरकारला आता बिलकुल सुट्टी नाही, आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला पाहिजे. आम्ही कुणाचं घेत नाहीत पण आमचं मात्र आम्ही मिळवणार यात काही शंका नाही.

ज्या नेत्यांना मोठे केले त्यांनी पाठ फिरवली
मराठा बांधवांनी कधीच कुणाची जात शोधली नाही. स्वत:च लेकरू उघड पडले पण दुस-याच्या लेकरांना सगळे दिले. जात कधी त्यांनी मानली नाही. माझ्या बापाने लोकांच्या लेकरांच्या डोळ्यातले पाणी पुसवण्याचे काम केले. आरक्षण देताना देखील आम्ही कधीच भेदभाव केला नाही. स्वत:च्या हक्कच आरक्षण दुस-याला दिले. ७५ वर्षात या राज्यात जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठा समाजांने केलं.

आपली लढाई आपल्याला लढायची आहे
मराठा समाजाने ज्या नेत्यांवर विश्वास ठेवला आणि त्यांनीच आपला घात केला. समाज यांच्यासाठी राबला आणि याना मोठे केले. एकही नेता तुमच्याकडे बघायला तयार नाही आता तरी जागे व्हा. आपल्या लेकरांच्या आक्रोश ऐकायाला आता कुणी राहिला नाही. कुणाची मदत आपल्याला होणार नाही. ज्यांना आपण मोठे केले तो आपल्यासमोर उभा आहे आणि म्हणतोय आरक्षण मिळू देणार नाही त्यामुळे जागे व्हा, आपली लढाई आपल्याला लढायची आहे असे देखील जरांगे या वेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR