29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयइंफाळ विमानतळावर युएफओच्या वृत्तानंतर राफेल लढाऊ विमाने रवाना

इंफाळ विमानतळावर युएफओच्या वृत्तानंतर राफेल लढाऊ विमाने रवाना

इंफाळ : गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूर राज्य हिंसाचाराने ग्रस्त आहे. दरम्यान, इंफाळ विमानतळाजवळ एक अनोळखी उडणारी वस्तू (युएफओ) दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाने (आयएएफ) त्यांचे राफेल लढाऊ विमान त्याच्या शोधासाठी रवाना केले. इंफाळ विमानतळावर रविवारी एक अज्ञात उडणारी वस्तू दिसली, त्यानंतर काही व्यावसायिक उड्डाणे देखील प्रभावित झाली. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इम्फाळ विमानतळाजवळ युएफओची बातमी मिळताच, जवळच्या एअरबेसवरून एक राफेल लढाऊ विमान युएफओ शोधण्यासाठी पाठवण्यात आले.

अत्याधुनिक सेन्सर्सने सज्ज असलेल्या विमानाने संशयित भागात युएफओ शोधण्यासाठी खूप खाली उड्डाण केले, परंतु तेथे त्याला काहीही सापडले नाही. पहिले विमान परतल्यानंतर आणखी राफेल लढाऊ विमाने शोधासाठी पाठवण्यात आली होती. परंतु, संपूर्ण परिसरात कुठेही युएफओ आढळला नाही. संबंधित एजन्सी युएफओबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, कारण युएफओचे व्हीडीओ इंफाळ विमानतळावरून समोर आले आहेत.

इंफाळ विमानतळावरून उड्डाणांना मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच, शिलाँग-मुख्यालय असलेल्या आयएएफच्या पूर्वी कमांडने सांगितले की, त्यांनी हवाई संरक्षण प्रतिसाद यंत्रणा सक्रिय केली आहे. त्यांनी याबाबत कोणतेही विशिष्ट माहिती माध्यमांना दिली नाही. ईस्टर्न कमांड, मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ऑब्जेक्ट दृश्यमान नाही. भारतीय हवाई दलाची राफेल लढाऊ विमाने पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरबेसवर तैनात आहेत आणि ते चीनच्या सीमेवर असलेल्या पूर्व भागातील विविध विमानतळांवरून उड्डाण करत असतात. राफेल लढाऊ विमानांनी नुकतेच चीनच्या सीमेवर ‘ईस्टर्न स्काय’ या मेगा एअर फोर्स सरावात भाग घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR