25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeराष्ट्रीय‘नीट’ घोटाळ्यातील पत्रकार सीबीआयच्या कचाट्यात!

‘नीट’ घोटाळ्यातील पत्रकार सीबीआयच्या कचाट्यात!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘नीट-युजी’ पेपर लीक प्रकरणी सीबीआयच्या पथकाने हजारीबाग येथील पत्रकार जमालुद्दीन याला सीबीआयने अटक केली. नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयने केलेली ही पाचवी अटक आहे. यापूर्वी सीबीआयने ओएसिस स्कूल हजारीबागचे प्राध्यापक एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आलम, मनीष आणि आशुतोष यांना अटक करण्यात आली होती. पत्रकार जमालुद्दीन हा कथितपणे डॉ. हक आणि आलमची मदत करत होता.

सीबीआयच्या पथकाला प्राध्यापक एहसान उल हकसोबत दोन पत्रकारांचं कनेक्शन असल्याचे आढळले. त्यानंतर त्यापैकी एक पत्रकार असलेल्या जमालुद्दीन याला अटक करण्यात आली आहे. हा झारखंडमधील एका हिंदी दैनिकाचा कर्मचारी आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी काही लोकांची चौकशी केली जात आहे. तसेच यानंतर आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.

पत्रकार आणि प्राध्यापक यांच्यादरम्यान पेपर लीक आणि नीट परीक्षेदरम्यान सातत्याने बोलणे होत होते. एहसान उल हकच्या कॉल डिटेल्सच्या आधारावर पत्रकाराला सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते.

बिहारच्या इकॉनॉमिकल ऑफेन्स युनिटने आपल्या तपासामध्ये हजारीबागच्या ज्या ओयॅसिस स्कूलशी तपासाची कडी जोडली होती. त्यावरून पुढील तपास करत सीबीआय संजीव मुखिया टोळीचा संपूर्ण प्लॅन समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR