मुंबई : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला. न्यूझीलंडच्या नावावर पहिला दिवस राहिला. न्यूझीलंड क्रिकेट टीमने पहिल्या दिवशी २ विकेट्स गमावून २५८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून रचीन रवींद्र आणि केन विल्यम्सन या दोघांनी नाबाद शतकी खेळी केली. दोघेही नाबाद परतले. केन विल्यम्सन याच्या कसोटी कारकीर्दीतील 30 वे शतक ठरले.
केनने यासह मोठा विक्रम केला. केनने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली यास मागे टाकत वेस्ट इंडिजचे दिग्गज डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड ब्रेक केला.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला झटपट २ झटके दिले. टॉम लेथम आणि डेव्हॉन कॉनव्हे या सलामी जोडीला दक्षिण आफ्रिकेने माघारी पाठवले. त्यानंतर केन विल्यम्सन आणि रचीन रवींद्र या दोघांनी तिस-या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. तसेच दोघे वैयक्तिक शतके झळकावत नाबाद राहिले. केनने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद ११८ धावा केल्या. तर रचीन ११८ धावांवर नाबाद राहिला. केन-रचीन दोघांनी तिस-या विकेटसाठी नाबाद २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
विराट-ब्रॅडमॅनला पछाडले
केनने २५९ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या. केनने या खेळीत १५ चौकार लगावले. केनने या शतकासह विराट कोहली आणि डॉन ब्रॅडमन या दोघांच्या शतकांचा विक्रम मोडीत काढला. विराट आणि ब्रॅडमन या दोघांच्या नावावर कसोटीत २९ शतकांची नोंद आहे. तर केनचं हे ३० वे शतक ठरले.