36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरेंनी उमेदवारी नाकारलेल्या करंजकरांकडे कोट्यवधींची संपत्ती

ठाकरेंनी उमेदवारी नाकारलेल्या करंजकरांकडे कोट्यवधींची संपत्ती

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना ठाकरे गटाची उमेदवारी शेवटच्या क्षणी नाकारण्यात आली. यामुळे आता करंजकर पक्षापासून अंतर ठेवून आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.

महाविकास आघाडीकडून नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्यात आला. या मतदारसंघात ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. वाजे यांनी आपली आर्थिक क्षमता नसल्याचे कारण देत उमेदवारी नाकारली होती. मात्र पक्षाने आग्रह करून त्यांना उमेदवारी दिली. सध्या मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि मतदार स्वत: पैसे जमा करून शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करीत आहेत. या सर्व घडामोडींत शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेल्या करंजकर यांच्याकडे चक्क २८ कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार आणि उमेदवारी नाकारलेले दोन्हीही चर्चेचा विषय ठरले आहेत.

विजय करंजकर यांनी शुक्रवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण असलेले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार करंजकर यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये सात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्यांना अद्याप एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR