34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeराष्ट्रीयअवयवदानात कर्नाटक देशात दुस-या क्रमांकावर

अवयवदानात कर्नाटक देशात दुस-या क्रमांकावर

बंगळूर : अवयवदानाच्या बाबतीतही कर्नाटक देशात दुस-या क्रमांकावर आहे. रक्तदात्याच्या कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. अवयवदात्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान कावेरी येथे विविध अवयवदान करणा-यांच्या कुटुंबियांना प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, अवयवदान करताना तुम्ही घेतलेला निर्णय सोपा नाही. तुमच्यामुळे इतरांचे प्राण वाचले आहेत. अवयवदानासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे यावे असे त्यांनी आवाहन केले.

आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, अवयवदानासाठी नोंदणी केलेल्यांची संख्या ८ हजारांहून अधिक असून गेल्या वर्षभरात केवळ १७८ अवयवदान झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR