19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांना २ नोव्हेंबरला अटक होऊ शकते : आप

केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला अटक होऊ शकते : आप

नवी दिल्ली : सीबीआयनंतर आता दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. ईडीने २ नोव्हेंबरला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आता आम आदमी पक्षाला त्यांच्या अटकेची भीती आहे. केजरीवाल यांना चौकशीदरम्यान अटक होण्याची भीती आपने व्यक्त केली आहे. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आणि आपच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी यांनी या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २ नोव्हेंबरला अटक होऊ शकते, असे त्या यावेळी म्हणाल्या.

आतिशी म्हणाल्या की, ईडी आणि सीबीआय गेल्या दीड वर्षांपासून मद्य धोरण घोटाळा प्रकरणाची चौकशी करत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांना भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा समोर ठेवता आलेला नाही. भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे न सापडले असतानाही आम आदमी पक्षाच्या नेत्यांना एकामागून एक तुरुंगात टाकले जात आहे. भाजप आणि पंतप्रधान, आप आणि अरविंद केजरीवाल यांना घाबरत आहेत, त्यामुळेच त्यांना अटक होऊ शकते, असा आरोप त्यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर हेमंत सोरेन, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी आणि पिनाराई विजयन यांना अटक केली जाईल, असा दावा आतिशी यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR