28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभारत हरल्याच्या रागात लहान भावाची हत्या

भारत हरल्याच्या रागात लहान भावाची हत्या

अमरावती : टीम इंडियाचा वर्ल्डकप फायनलमध्ये पराभव झाला आणि देशातील १४० कोटी जनतेचा हिरमोड झाला. वर्ल्डकप हरल्याच्या रागात अमरावतीत तर एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्ल्डकप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की, मोठ्या भावाने रागाच्या भरात स्वत:च्या सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे
.
आपणच वर्ल्डकप जिंकणार असा विश्वास असलेल्या प्रत्येकाचाच अपेक्षाभंग झाला आणि कांगारूंनी मोठ्या शिताफीने टीम इंडियाकडून वर्ल्डकप हिसकावला. अनेकांना हा पराभव पचवणे कठीण गेले. काही धाय मोकलून रडले, तर काहींनी थेट गोंधळ घातला, कोणी टीव्ही फोडला, तर कोणी आदळआपट करून राग काढला.

अमरावतीत मात्र धक्कादायक प्रकार घडला. वर्ल्डकप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद विकोपाला गेल्याने भावानेच भावाची हत्या केली.
अमरावतीतल्या अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मटण खाऊन आले म्हणून भारत हरला, असे म्हणत दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर लोखंडी सळईने हल्ला केला. यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR