22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकिंग चार्ल्स यांना कॅन्सरचे निदान

किंग चार्ल्स यांना कॅन्सरचे निदान

लंडन : ब्रिटनचे किंग चार्ल्स (तृतीय) यांना कँसरची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बकिंहम पॅलेसने याबद्दलचे निवेदन जारी केले आहे.

किंग चार्ल्स तृतीय यांना कॅन्सरची लागण झाली असून प्रोटेस्ट ग्रंथीच्या चाचणीदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे समोर आले. मात्र कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे याबद्दल खुलासा करण्यात आला नाही. कॅन्सरचा प्रकार आणि तो शरीरातील कोण्यात भागात आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

डॉक्टरांनी किंग चार्ल्स यांना कोणतेही सार्वजनिक कामकाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते या उपचारांदरम्यान राजकीय कामकाज करत राहाणार आहेत.

किंग चार्ल्स यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकर लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ते लवकरच पूर्ण ताकदीने परततील याची मला खात्री आहे, संपूर्ण देश त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असेल अशी पोस्ट सुनक यांनी सोशल मीडीया व प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स (तृतिय) ब्रिटनचे किंग बनले होते. मागील वर्षी मे मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला होता. यानंतर त्यांना किंग चार्ल्स (तृतिय) नावाने संबोधित केले जाते. त्यांचे वय ७३ वर्ष आहे.

चार्ल्स यांनी २९ जुलै १९८१ मध्ये लेडी डायना स्पेंसर हिच्याशी लग्न केले. त्यांना प्रिंस विलियम आणि प्रिंस हॅरी ही मुले आहेत. २८ ऑगस्ट १९९६ रोजी हे लग्न मोडले. ९ एप्रिल २००५ मध्ये त्यांनी कॅमिला हिच्याशी लग्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR