29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरलातूर शहरात कोयता गँगची दहशत

लातूर शहरात कोयता गँगची दहशत

लूटमार, गाड्यांच्या तोडफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लातूर : पुणे शहरात पाहायला मिळालेली कोयता गँगची दहशत आता लातूर शहरात देखील पाहायला मिळत आहे. कारण मागील काही दिवसांत लातूरमध्ये कोयता गँगची प्रचंड दहशत दिसून येत आहे.

अशीच घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाहायला मिळाली असून, लातूर शहरात तब्बल तीन तास कोयता गँगची दहशत सुरू होती. खंडणी वसुली करणे, गाड्यांची तोडफोड करणे, लोकांना दहशत दाखवणे असे प्रकार शहरात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात दोन जणांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री नऊ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरात हा सर्व प्रकार सुरू होता.

लातूर शहरात दिवसेंदिवस गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढत आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुण मंडळी हातात धारदार शस्त्र आणि कोयता घेऊन फिरत असतात. भाजी मार्केटमध्ये येऊन भाजीवाल्याकडून जबरदस्ती पैसे वसूल केले जातात. त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली जाते. लोकांच्या अंगावर धारदार शस्त्र घेऊन धावून जातात. काल रात्री असाच प्रकार दोन तरुणांनी केला आहे. तोहित पठाण आणि मोन्या बनसोडे अशी या तरुणांची नावे आहेत.

गाड्यांची तोडफोड केली…
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील भाजी मार्केटमध्ये तोहित पठाण आणि मोन्या बनसोडे या दोघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी एक ट्रॅव्हल आणि एका कारची तोडफोड केली. यात अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान आले आहे. भाजीवाल्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्यात आले आहेत. बिडवे इंजिनीअरिंग कॉलेजपासून गांधी चौकापर्यंत या तरुणांनी दहशत निर्माण केली होती. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळाल्यानंतर पोलिसांची दोन पथकं रवाना केली. यातील तोहीत पठाण याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, मोन्या बनसोडे अद्याप फरार आहे. पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांमध्ये प्रचंड दहशत…

मागील काही दिवसांपासून लातूर शहरात गुंडांची प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे. हातात कोयत्यासारखे शस्त्र घेऊन हे तरुण बिनधास्त मुख्य मार्केटमध्ये दहशत निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. खंडणी देखील वसूल केली जाते. हातात शस्त्र पाहून छोटे-छोटे व्यावसायिक घाबरून जातात आणि त्यांना पैसे काढून देतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR