28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलातूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ

लातूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ

लातूर : प्रतिनिधी
शासकीय अभिलेखांच्या तपासणीमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद गतीने करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी दिले आहेत. त्यानुसार लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात भिसे वाघोली येथील ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यसह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR