24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रभीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार

भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार

युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी

नागपूर : भीमा कोरेगावदिनी झालेला हल्ला हा सुनियोजीत कट होता. मुलतत्ववादी संघटनेने तो घडवून आणला होता. त्यांचे पितळ उघडे पडले. पोलिस यंत्रणांचे अपयशही यातून पुढे आले. याप्रकरणीचा युक्तीवाद आता पूर्ण झाला आहे. यात शरद पवार, प्रा. जोगेंद्र कवाडे, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांसह जवळपास ८५ जणांची उलटतपासणी करण्यात आली. याप्रकरणी गठीत आयोगाचा अहवालही तयार असून तो लवकरच सरकारला सादर होईल.

इतिहासाला विकृत स्वरूप देण्याचा मुलतत्वादी संघटनेचा प्रयत्न फसला असून सरकारनेच भीमा कोरेगावचा इतिहास सत्य असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे न्याय मिळेल अशी अपेक्षा या प्रकरणात न्यायालयात लढा देणारे अ‍ॅड. किरण चन्ने यांनी येथे व्यक्त केली. एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. अ‍ॅड. किरण चन्ने म्हणाले, भीमा कोरेगावचा इतिहास खोटा असल्याचा जोरदार प्रयत्न झाला. ऐतिहासिक दस्ताऐवज आणि मिलीट्री पुस्तक, सिंबॉल आदी पुरावे सादर करण्यात आले. राज्य सरकारने सुद्धा भीमा कोरेगावचा इतिहास हा सत्य असल्याचे विधिमंडळात मान्य केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भीमा कोरेगाव येथील हल्ल्याशी एल्गार परिषदेचा कुठलाही संबंध नसल्याचेही अ‍ॅड. चन्ने यांनी स्पष्ट केले.

वारकरी विज्ञानवादी, समतावादी
वारकरी हे अंधश्रध्देला विरोध करतात. समतावादी आहेत. वारकरी हे अहिंसेवर विश्वास करतात. धारकरी हे हिंसावादी आहेत. त्यामुळे वारक-यांच्या वारीत पुण्यात तलवारी काढल्या गेल्या. वारकरी हे विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवतात. त्यामुळे त्यांच्यात धारकरी घुसून असे प्रकार करतात, याकडे अ‍ॅड. चन्ने यांनी लक्ष वेधले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR