पुणे : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊराया योजना या सर्वसामान्यांसाठी लागू करण्यात आल्या आहेत. त्यातच आता लाडकी सूनबाई योजना सुरू करण्याची मागणी होत असताना बारामतीमधून एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लाडकी सूनबाई योजना, सासूबाईच्या जेवणावर सूनबाईचे जेवण फ्री असे या पोस्टरवर नमूद करण्यात आले आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे.
याशिवाय सासूबाईला जेवायला घेऊन येणे आवश्यक, सासूबाईला जी थाळी देणार तीच थाळी सूनबाईला फ्री मिळणार. घरामधील कमीत कमी पाच लोकांना जेवायला मिळणार.. अशा सूचना केल्या आहेत.