27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रझोपमोड केल्यामुळे भाडेकरूकडून घरमालकाची हत्या

झोपमोड केल्यामुळे भाडेकरूकडून घरमालकाची हत्या

पुणे : पुरेशी झोप ही शरीराची गरज आहे. अनेकवेळा काही कारणामुळे झोप होत नाही. एखाद्याने झोपमोड केली तरी राग येतो. पुणे शहरात मात्र झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने चक्क घरमालकाची हत्या केली. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ माजली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संतोष राजेंद्र धोत्रे याला अटक केली आहे. घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवल्याचा राग संतोष धोत्रे यांना आला. त्यानंतर त्यांनी घरमालक दादा ज्ञानदेव घुले यांची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली.

दादा ज्ञानदेव घुले यांच्या घरात संतोष राजेंद्र धोत्रे राहतात. सोमवारी दुपारी संतोष धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी दादा ज्ञानदेव घुले यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकीचा हॉर्न जोरजोराने वाजवला. त्याचा संताप धोत्रे यांना आला. आपली झोपमोड केल्यामुळे धोत्रे याने दादा घुले यांना शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून त्यांचा खून केला. या प्रकारामुळे पुण्यात चाललंय काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रस्त्यावर कोयता चालवण्याचे प्रकार सतत पुण्यात घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून एकाने दुस-यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR