कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

मुंबई / रायगड : प्रतिनिधी
कोकणात पावसाचे थैमान सुरू आहे. सलग सहा दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-पोलादपूर दरम्यान असलेल्या कशेडी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे आज (६ जुलै) पहाटे चार वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड जेसीबीने हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या महामार्गावर दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचवेळी महामार्गावरील वाहतूक महाड-विन्हेरी मार्गावरून वळवण्यात आली आहे. मात्र, खवटी येथे दरड कोसळल्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत म्हणजे ९ तास वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून त्यांचा संताप अनावर झाला आहे.

आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात दरड कोसळली. ही माहिती मिळताच महामार्ग पोलिस प्रशासन, खेड पोलीस, महसूल विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी समन्वय साधून तातडीने घटनास्थळी धाव घेतील आणि दरड हटवण्यासाठी जेसीबी यंत्रणा कार्यान्वित केली. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे.

दरम्यान, रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणा-या माणगावजवळील ताम्हिणी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या मार्गावरीलही वाहतूक ठप्प आहे. पुणे हद्दीत रस्ता खचला असून दोन ठिकाणी झाडे कोसळली आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहतुकीसाठी ताम्हीणी घाटाचा मार्ग धोकादायक झाल्याने घटनास्थळी सुरक्षा यंत्रणांनी धाव घेतली आहे.

सुकेळी खिंडीत पाणीच पाणी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडीजवळ पाणी साचल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी झाली असून प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. परिणामी पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत महामार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज महामोर्चा!
03:36
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये उबाठाचे रामरक्षा आंदोलन; दानप्रकरणावर संताप
02:44
Video thumbnail
Nanded|रेल्वे गाड्यांच्या उद्घाटनापूर्वी उबाठा पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा
01:10
Video thumbnail
'मिसिंग लिंक'वर पावसाचा फटका; दरड कोसळल्यानंतर ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
00:41
Video thumbnail
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केली तिसरी लग्नगाठ; गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल.
00:48
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26
Video thumbnail
निलंग्यात सावकारांचा नंगा नाच! शेतकऱ्यांचे अपहरण करून मारहाण?अर्धं गाव रिकामं... नेमकं काय घडतंय?
09:40
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08

Latest news