मावळ तालुक्यात घरावर दरड कोसळली; संपूर्ण कुटुंब ढिगा-याखाली

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शहरात झाडपडीच्या घटना समोर येत आहेत. अनेक भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. तसेच ग्रामीण भागातही पावसाने धूमाकूळ घातला आहे. अशातच मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज पहाटे ६ च्या सुमारास एका घरावर दरड कोसळली आहे.

मिळविलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी , पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलच्या पुणे येथील ५व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह घटनास्थळाकडे रवाना झाले. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
06:53
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही; न्यायासाठी आमरण उपोषण
01:51
Video thumbnail
Latur|लातुरात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज महामोर्चा!
03:36
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये उबाठाचे रामरक्षा आंदोलन; दानप्रकरणावर संताप
02:44
Video thumbnail
Nanded|रेल्वे गाड्यांच्या उद्घाटनापूर्वी उबाठा पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा
01:10
Video thumbnail
'मिसिंग लिंक'वर पावसाचा फटका; दरड कोसळल्यानंतर ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
00:41
Video thumbnail
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केली तिसरी लग्नगाठ; गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल.
00:48
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26
Video thumbnail
निलंग्यात सावकारांचा नंगा नाच! शेतकऱ्यांचे अपहरण करून मारहाण?अर्धं गाव रिकामं... नेमकं काय घडतंय?
09:40
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21

Latest news