लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील सर्व शेतक-यांच्या खात्यात अग्रीम पीकविमा जमा करावा यासाठी मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत पीकविमा कार्यालयाच्या फलकास काळे फासण्यात आले.
यावर्षी लातूर जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाला आहे, जिल्ह्यातील सातही महसूल मंडळामध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला होता पावसाचा दीर्घ खंडामुळे तसेच पिकाच्या वाढीच्या व फुले लागण्याच्या कालावधीमध्ये तापमान ३० ते ३२ से पेक्षा जास्त राहिल्यामुळे अनेक ठिकाणची पिके वाळून फुलगळ झाली त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० टक्के पेक्षा घट येणार आहे, अशी स्थिती निर्माण झाल्याने आपण जिल्हास्तरीय संयुक्त्त समितीमार्फत अधिसूचित मंडळामध्ये अधिसूचित पिकाच्या एकूण क्षेत्राच्या पाच टक्के नजर अंदाजाने कृषी विभाग विमा कंपनी प्रतिनिधी स्थानिक शेतकरी प्रतिनिधी यांच्यामार्फत सर्वेक्षण करुन अहवाल सादर करणेबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार कृषी विभाग विमा कंपनी प्रतिनिधी स्थानिक शेतकरी प्रतिनिधी यांनी संयुक्त्तपणे सर्वेक्षण करुन अहवाल सादर केला. या अहवालानुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात ६० ते ७० टक्के घट होण्याची शक्यता जिल्ह्यातील साठही महसूल मंडळामध्ये दर्शविली गेली त्यामुळे या अहवालानुसार माननीय जिल्हाधिकारी लातूर यांनी १ सप्टेंबर रोजी २५ टक्के अग्रीम पिक विमा देण्यासंदर्भात अधिसूचना काढली. विमा कंपनीने अपिलावर अपील न करता तात्काळ साठही महसूल मंडळातील शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत या मागणीसाठी मनसेच्या वतीने एसबीआय जनरल कंपनीच्या जिल्हा कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीसह निदर्शने करत एसबीआय जनरल कंपनीचे कार्यालय बंद असल्याने मनसेच्या वतीने कार्यालयाच्या फलकास व बंद शटरला काळे लावण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, जिल्हाध्यक्ष संजय राठोड, जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा रेखाताई नागराळे, सचिन सिरसाट, वाहिद शेख, किरण चव्हाण, महेश माने, अजय कलशेट्टी, मनोज अभंगे, बाळासाहेब मुंडे, सोमनाथ कलशेट्टी, महेश देशमुख, संग्राम रोडगे, वंदनाताई केंद्रे, रवि सूर्यवंशी, बजरंग ठाकूर, वैभव जाधव, परमेश्वर पवार, जहांगीर शेख, अनिल पांढरे, पप्पू आकनगिरे, रवी पांचाळ, भागवत कांदे, नरेश कांदे, शिवराज सिरसाट, भागवत मुंडे, अनिल सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.