24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राची विधान परिषद झाली १०० वर्षांची

महाराष्ट्राची विधान परिषद झाली १०० वर्षांची

मुंबई : विधान परिषदेतील सदस्यांनी भाषणांद्वारे व्यक्त केलेली व्यापक लोकहिताची भूमिका आजही सर्वांना मार्गदर्शन करणारी आहे. सदस्यांनी लोकहितासाठी वेळोवेळी सभागृहात आपली मते अभिव्यक्त केली आणि त्यातूनच लोकहिताचे अनेक क्रांतिकारी कायदे तयार झाले. त्यामुळे विधान परिषदेतील कामकाजात आजी व माजी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि माजी विधान परिषद सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्रेहमेळावा विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी उपसभापती बोलत होत्या.

याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च, तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य- रोजगार- उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे आजी- माजी सदस्य, विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

उपसभापती गो-हे म्हणाल्या, विधान परिषदेतील सदस्य हे चळवळीतून, वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेले असतात. समाजमनाचा अचूक मागोवा घेऊन सभागृहात बोलत असतात. त्यांच्या योगदानामुळेच रोजगार हमी कायदा, स्त्रीभ्रूणहत्या कायदा, प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन कायदा, डान्सबार बंदी कायदा, माहितीचा अधिकार यांसारखे समाजाचे जीवनमान उंचावणारे कायदे करण्यात विधान परिषदेचे मोठे योगदान राहिले आहे. सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाज चालवले जात आहे. अधिवेशन काळात समाजाचे लक्ष कसे कामकाजावर असते, याबाबतचा आपला अनुभवही उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी या वेळी सांगितला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR