33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरउन्हाच्या तीव्र झळांमुळे जिल्ह्यातील पशुधन धोक्यात

उन्हाच्या तीव्र झळांमुळे जिल्ह्यातील पशुधन धोक्यात

पंढरपूर : वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे, अचानक झालेल्या तापमानाच्या वाढीमुळे जनावरांना उष्माघात व लाळ्या खुरकूतसदृश रोगाचा सामना करावा लागत आहे. एकूणच, या उष्णतेच्या झळांमुळे सोलापूर जिल्ह्यातील पशुधन धोक्यात आले आहे. म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती निगा राखून त्यांची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सोलापूर जिल्ह्याची कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळख आहे, शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुग्धोत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या कष्टाने आपल्या जनावरांचा सांभाळ करीत आहेत. दुग्धोत्पादनाबरोबरच शेळी व मेंढीपालन या पूरक उद्योगामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्वैर्य मिळायला चांगलीच मदत झाली आहे. जिल्ह्यात सुमारे १२ लाख ५०० गायी व म्हशी आहेत. सुमारे साडेसात लाख शेळ्या तर सुमारे ७२ हजार मेंढ्या आहेत. सध्या उन्हाळा सुरू आहे.

त्यातच अचानक वातावरणात बदल झाला आणि उष्णतेची लाट तयार झाली. गेल्या आठवड्यात ३५ अंश सेल्सिअसवर तापमान असणारे आज सुमारे ४१ अंश सेल्सिअसवर गेले. त्यामुळे सर्व सजीवांना या उष्णतेचा त्रास होऊ लागला आहे. काही शेतातील पिके धोक्यात आली असतानाच या उष्णतेचा पशुधनालाही धोका निर्माण झाला आहे.

या वाढलेल्या उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरातील पोटॅशचे प्रमाण कमी होते. परिणामी जनावरे चारा खात नाहीत. त्यामुळे दुग्धोत्पादनात घट झाली आहे. नवजात वासरांचे वजन वाढण्यात अडचणी येत आहेत. काही भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह सावली व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जनावरांना उष्माघात व लाळ्या खुरकूतसदृश रोगाचा धोका निर्माण झाला आहे.

उन्हाळ्यात चारा पिकांची वाढ फारच कमी होत असते. ही वाढ थांबू नये म्हणून रेलिबॅक्ट किट या नावाचे नवीन संशोधित प्रॉडक्ट आले आहे. हे औषध विषमुक्त आहे. त्याची फवारणी चारा पिकावर केली तर चारा पिकाची वाढ जोमदार होते. किडीसाठी वेगळ्या औषधांची फवारणी करावी लागत नाही. चारा सकस व चविष्ट बनतो. त्यामुळे असा चारा जनावरे आवडीने खातात. जनावरांची हिरव्या व सकस चाऱ्याची गरज भागते. त्यामुळे जनावरे उन्हाळ्यातील आजाराला फारशी बळी पडत नाहीत. असे कृषितज्ज्ञ बिभीषण शिंदे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR