21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहालक्ष्मी, ज्योतिबा मंदिरात भाविकांची सुरक्षा होणार ‘हायटेक’

महालक्ष्मी, ज्योतिबा मंदिरात भाविकांची सुरक्षा होणार ‘हायटेक’

कोल्हापूर : महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांची सुरक्षा आता ‘हायटेक’ करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जॅमर आणि चेहरे टिपणारे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे प्रतिज्ञापत्र मंदिर समितीने हायकोर्टात सादर केले आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात १०७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच विमानतळाप्रमाणे मंदिरात येणा-या भाविकांच्या सामानाची तपासणी केली जाते. त्यामुळे मंदिर परिसरातील चोरीचे प्रमाणही कमी झाल्याचा दावा प्रतिज्ञापत्रातून करण्यात आला आहे.

मंदिरात सध्या जे सुरक्षारक्षक आहेत, त्यांचे काम भाविकांवर लक्ष ठेवण्े तसेच रांगेचे नियोजन करणे असे आहे. त्यांना कामावरून न काढता अतिरिक्त शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक केली तर समितीवर आर्थिक बोजा वाढेल, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

मंदिरात येणा-या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर समितीने काही उपाययोजना केल्या आहेत. प्रशिक्षित शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. या नेमणुकीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी, अशी विनंती मंदिर समितीने प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टाकडे केली आहे. मात्र तूर्तास ही स्थगिती उठवण्यास नकार देत हायकोर्टाने सुनावणी २० डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR