26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमहाप्रसादाने १०० जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

महाप्रसादाने १०० जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना, अनेकजण अत्यवस्थ

चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादातून १०० जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाप्रसाद घेतल्यानंतर जवळपास १०० जणांना त्रास सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रामप्रेक्ष यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत्यू झालेली व्यक्ती वृद्ध असल्याची माहिती आहे. अनेकांना रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादातून १०० नागरिकांना विषबाधा झाली. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हा मृत्यू नोंदविला गेला आहे. भोजनानंतर सहभागी १०० लोकांना रात्री उशिरा मळमळ-उलटीचा त्रास झाल्यानंतर आसपासच्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, स्थानिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली. सध्या पोलिस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR