40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरकुंटनखाना चालवणा-या माय लेकीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

कुंटनखाना चालवणा-या माय लेकीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

उदगीर : प्रतिनिधी
तालुक्यातील सोमनाथपूर हद्दीत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अगदी जवळील एका उच्चभ्रु वस्तीतील कुंटनखान्यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कुंटनखाना चालवणा-या माय लेकीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच यात पकडलेल्या दोन पिडीतेची लातूरच्या महिला सुधारगृहात रवांनगी केली असून सहा जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी सायंकाळी सोमनाथपुर हद्दीतील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हाकेच्या आंतरावर एका उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षकांना मिळाली. त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील एका घरात सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर धाड टाकली. त्यावेळेस त्यांना चार महिला, चार ग्राहक पुरुष कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले. याची सखोल चौकशी केली असता या चार महिलांपैकी दोन महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत देह विक्रीसाठी प्रवृत करण्यात आल्याचे समोर आले.

या पिढीत महिलांचा जवाब घेतल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी मुंढे यांच्या फिर्यादीवरुन कुंठणखाना चालवणा-या कल्लुबाई नरसींह माने, मुलगी बालिका नरसींह माने, विठ्ठल मारोती केंद्रे (वय-३०) रा.तळ्याची वाडी ता. कंधार, विठ्ठल भगवान नरसींगे (वय-३५) रा. निळकंठ, ता. औसा. व दोन अल्पवयीन बालक अशा आठ जणांवर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास देह व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR