21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रमला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवितो

मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवितो

संभाजीराजे छत्रपतींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

कोल्हापूर : मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो, हे संभाजीराजे छत्रपती यांचे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संभाजीराजांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. सारथीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाच्या आंदोलन स्थळी उपस्थित राहत, संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली.

मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी गमतीत म्हटले आहे. कोल्हापुरात सारथीच्या विविध प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यावर संभाजीराजे गमतीत म्हणाले की, मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत सोडवतो. संभाजीराजेंचा हाच व्हीडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR