18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeक्रीडामनू भाकर आणि गोलकीपर श्रीजेश करणार भारतीय संघाचे संयुक्त ध्वजसंचलन

मनू भाकर आणि गोलकीपर श्रीजेश करणार भारतीय संघाचे संयुक्त ध्वजसंचलन

नवी दिल्ली : खेळाचा महाकुंभ समजल्या जाणा-या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. २६ जुलै रोजी सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ५ पदकांची कमाई केली आहे. आपापल्या स्पर्धा झाल्यानंतर अनेक खेळाडू मायदेशात परतले आहेत. पण, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभासाठी हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर यांची भारतीय दलाचे ध्वज वाहक म्हणून निवड केली आहे.

आयओएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेच्या समारोप समारंभातनेमबाज मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश यांची संयुक्त ध्वजवाहक म्हणून निवड करताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आनंद होत आहे. दरम्यान, आयओए अध्यक्ष पीटी उषा म्हणाल्या की, ‘शेफ डी मिशन गगन नारंग आणि संपूर्ण भारतीय दलासाठी श्रीजेशेची निवड करणे खूप भावनिक होते. श्रीजेशने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय हॉकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मी भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकणा-या नीरज चोप्राशी चर्चा केली, तेव्हा नीरजनेही श्रीजेशचे नाव सुचवले असते. यावरून नीरजला श्रीजेश आणि भारतीय खेळातील त्याच्या योगदानाबद्दल असलेला प्रचंड आदर दिसून येतो.

मनूला पुन्हा पॅरिसला जावे लागेल
नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. मनूने १० मीटर एअर शूटिंगमध्ये कांस्य पदकावर नाव कोरले. यानंतर मनूनेही सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगच्या साथीने दुस-यांदा कांस्य पदकाची कामगिरी केली. स्पर्धा झाल्यानंतर मनू भारतात परतली, पण आता तिला या निरोप समारोप समारंभासाठी पुन्हा पॅरिसला जावे लागेल. तर पीआर श्रीजेशने भारतीय पुरुष हॉकी संघासाठी गोलरक्षक म्हणून चमकदार कामगिरी केली. भारतीय हॉकी संघाने स्पेनचा २-१ असा पराभव करुन कांस्यपदकावर नाव कोरले. श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR