29 C
Latur
Thursday, March 12, 2026
Homeमनोरंजन‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे मराठी प्रेम

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे मराठी प्रेम

हिंदीत बोलण्याची विनंती करताच आमिर खानचे मराठी बोलण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकासाठी आज मतदान पार पडले आहे. मुंबईत अनेक सेलिब्रिटी मंडळीही आपला मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळाली. अशातच अभिनेता आमिर खानही त्याचे मत देऊन बाहेर आला. तेव्हा त्याच्यासोबत एक घटना घडली, जी सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आमिर खाननेही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मतदान केंद्राबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आमिरने जे विधान केले, त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी आमिर मराठीत बोलत होता. आमिरला मराठीत बोलताना पाहून एका पत्रकाराने त्याला विनंती केली सर, कृपया हिंदीतही बोला (देशासाठी). यावर आमिरने क्षणाचाही विलंब न लावता म्हटले, हिंदीत कशाला? हा महाराष्ट्र आहे भाऊ. आमिरचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वच जण अवाक झाले. जेव्हा पत्रकाराने त्याला पुन्हा सांगितले की, हा व्हीडीओ दिल्लीसह देशभरातील प्रेक्षक पाहत आहेत, तेव्हा आमिरने हसून हिंदीतही आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी आमिरने मुंबई महानगरपालिकेच्या व्यवस्थेचेही कौतुक केले. आमिर खानचा हा व्हीडीओ समोर येताच नेटक-यांमध्ये भाषेवरून चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी आमिरच्या हा महाराष्ट्र आहे भाऊ या विधानाचे समर्थन केले असून, महाराष्ट्रात मराठीलाच प्राधान्य दिले पाहिजे, अशा कमेंट्स केल्या आहेत. मतदानाच्या दिवशीच आमिरने दाखवलेल्या या मराठी प्रेमामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR