37.4 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग

छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर धुळे महामार्गावर तीसगावजवळील हॉटेल ग्रँड सरोवर याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास ही आग लागली असून अगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून चार बंबाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, आग हॉटेलच्या किचनमधून लागल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे हॉटेल शिवसेना(शिंदे गट) आमदार प्रदीप जयस्वाल यांचे असल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR