28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरप्रकृती खालावली, डॉ. राऊत, सूर्यवंशी रुग्णालयात

प्रकृती खालावली, डॉ. राऊत, सूर्यवंशी रुग्णालयात

लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठींबा म्हणून येथे गेली पाच दिवसांपासून आमरण उपोषण करीत असलेले लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. हर्षवर्धन राऊत व अविनाश सूर्यवंशी यांची गुरुवारी सकाळी पकृती खालावल्याने त्यांना तातडीने येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

डॉ. राऊत यांचा रक्त्तदाब व अशक्तपणा वाढला होता. त्यांना भोवळही येत होती. अविनाश सूर्यवंशी यांना लघवीचा त्रास होता व त्यांच्या छातीत दुखत होते या दोघांचीही डॉक्टरांनी उपोषनस्थळी तपासणी केली व त्यांना रुग्णवाहीकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. या दोघांनाही दुपारी डिसचार्ज देण्यात आला आहे. दरम्यान रेणापूर तालुक्यातील गरसोळी येथील उपोषणकर्ते श्रीधर पवार यांचीही प्रकृती ढासाळल्याने त्यांच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR