35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरसोलापूरात मेफेड्रोन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

सोलापूरात मेफेड्रोन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार एका तरुणास ताब्यात घेऊन केलेल्या झाडाझडतीत त्याच्या जवळून ११.८७० ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) जप्त केलंय. सोलापुरात अंमली पदार्थ मेफेड्रॉन विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला.

सोलापूर शहराच्या आसपास काटी-चिंचोली, मोहोळ येथील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत सोलापूर ग्रामीण आणि मुंबई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मेफेड्रोन निर्मितीचे अड्डे सील करण्यापूर्वी कोट्यावधी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ म्हणून गणले जाणारे मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. या अंमली पदार्थाची सोलापुरात विक्री होत होतेय किंवा कसे याची माहिती काढत असताना गुन्हे शाखेचे पोउनि अल्फाज शेख यांच्या पथकास महत्वाची खबर मिळाली.

पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने देगाव रोड येथील देशमुख-पाटील वस्ती येथे राहणाऱ्या तरुणास तो त्या परिसरात मेफेड्रोन विकत असल्याच्या खबरीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार एनडीपीएस अ‍ॅक्टच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात विक्रीकरिता ठेवलेले लहान-लहान प्लास्टीकचे २९ पाऊच त्यामध्ये ११ ग्रॅम ८७० मि.ग्रॅम वजनाचे २९,६७५ रूपये किंमतीचे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला.

त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात विक्रीकरिता ठेवलेले लहान-लहान प्लास्टीकचे २९ पाऊच त्यामध्ये ११ ग्रॅम ८७० मि.ग्रॅम वजनाचे २९,६७५ रूपये किंमतीचे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला. सलिम रशिद शेख (वय-३३ वर्षे, रा. देशमुख-पाटील वस्ती, देगाव रोड, सोलापूर) असं त्या तरुणाचं नांव आहे. सोलापुरातील अंमली पदार्थाचे विक्रीचे जाळ्यातील एका छोटा मासा या कारवाईत पोलिसांच्या हाती लागला आहे, मात्र या कारवाईनं अंमली पदार्थाची विक्री आता गल्लीपर्यंत आल्याचे दिसून येत आहे.

तो अंमली पदार्थ जप्त करुन, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११५/२०२४ एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सलिम रशिद शेख यास या गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर, त्याने मेफेड्रोन हा अंमली पदार्थ मुंबई येथून आणल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. सपोनि श्रीनाथ महाडिक या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप- आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, सिध्दाराम देशमुख, संजय साळुंखे, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील यांनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR