31.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसोलापूरराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार

सोलापूर : सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने बुधवारी दि.०६/०३/२०२४ रोजी पक्षाचे नवीन मिळालेले निवडणूक चिन्ह तुतारी वाजविणारा माणुस याची नागरीकांना माहिती व्हावी व ते चिन्ह रुजवावे या हेतुने कौतम चौक, मधला मारूती, माणिक चौक, सोन्या मारूती, नवी पेठ ते छत्रपती शिवाजी चौक पर्यत भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे .शरदचंद्र पवार सुमारे सात दशकांपासुन सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असुन अनेक महत्वाच्या पदावर कार्य केलेले आहेत गोरगरीब नागरीक, कष्टकरी, युचक, महिला व शेतकरी यांच्यासाठी सातत्याने झटणारे व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करुन न्याय देण्याचा काम त्यांनी आजपर्यंत केलेला आहे. जनतेच्या मनात काय आहे हे ओळखुन ते सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणून त्याना रयतेचा राजा म्हंटले जाते.

शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना मन १९९९ केली सबंध देशामध्ये पक्षवाढीसाठी कामे केली अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्याना महत्वाची पदे देऊन मोठे केले. सर्वधर्म समभाव व पुरोगामी विचार सरणीशी कधीच तडजोड केलेली नाही. असे असताना पक्षात दोन गट निर्माण केले गेले अजितदादा पवार यांनी सत्येच्या लालचेपोटी भाजपा सारख्या पक्षाबरोबर हात मिळवणी करुन पक्षात फूट पाडली तरी देशाच्या व राज्याचे ८० टक्के पदाधिकारी. कार्यकर्ते व जनता हि नेहमी पवार यांच्या बरोबर राहिली असताना भारताच्या निवडणुक आयोगाने पार्टी आणि चिन्ह हे अजितदादा पवार यांना देण्याचा दुर्दैवी व चुकीचा निर्णय दिला अश्या परिस्थितीत हि न डगमगता हाताश व निराश न होता पवार यांनी निवडणूक आयोगाने दिलेले नवीन चिन्ह तुतारी वाजविणारा माणुस घेऊन रायगडावर त्याचे शानदार उद्घाटन केले व उत्साहाने पुन्हा पक्षाच्या कामाची सुरुवात केली. आजही शरदचंद्र पवार तरुणांच्या बरोबरीने काम करीत असून रोज त्यांचे राज्यभरात दौरे चालु आहेत. राजकारणात टिका करताना त्यांनी आपल्या मर्यादा कधीहि ओलांडलेल्या नाहीत अश्या थोर नेत्याबरोबर जनतेची सहानुभुती तर आहेच पण पक्षात काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांचा रास्त अभिमान आहे

शहर अध्यक्ष पदी निवडीनंतर पक्षाच्या वतीने फ्रंटल व सेलचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष मिटींग, तीन विधान सभा अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची मिटींग घेऊन त्यांच्या सर्व कार्यकारिणीला कार्यरत करण्याकामी व पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून त्यांच्याशी चर्चा केली, तसेच शहरातील सर्व जेष्ठ नेते व प्रदेश पदाधिकारी यांची समन्वयक समितीची बैठक घेऊन पक्षवाढीचे धोरण ठरवण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR