22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeराष्ट्रीयअतिरेक्यांनी घरात घुसून पोलीस कर्मचाऱ्यावर झाडल्या गोळ्या

अतिरेक्यांनी घरात घुसून पोलीस कर्मचाऱ्यावर झाडल्या गोळ्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे अतिरेक्यांनी राज्य पोलिस दलाचे हेड कॉन्स्टेबल गुलाम मोहम्मद डार यांच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बारामुल्ला येथील वालू करालपोरा येथे घडली. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरू आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी म्हटले की, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते शहीद झाले आहेत. या हुतात्म्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR