27.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeक्रीडासलग ४ पराभवानंतर ‘पाक’ गोड; बांगलादेश ७ विकेट्सने पराभूत

सलग ४ पराभवानंतर ‘पाक’ गोड; बांगलादेश ७ विकेट्सने पराभूत

जमानच्या ८१ तर शफीकच्या ६८ धावा, वसीम-आफ्रिदीच्या ३-३ विकेट

कोलकाता : सलग ४ पराभवानंतर पाकिस्तानने विश्वचषकात विजय मिळविला असून पाक संघाने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी ३२.३ षटकांत ३ गडी गमावून २०५ धावांचे लक्ष्य पार केले. सलामीवीर फखर जमानने ८१ धावांची तर अब्दुल्ला शफीकने ६८ धावांची खेळी खेळली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली.

कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४५.१ षटकांत २०४ धावा करून संघ सर्वबाद झाला. शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. या विजयासह, संघ ७ सामन्यांपैकी ३ विजय आणि ४ पराभवानंतर ६ गुणांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. संघाला अजून २ सामने खेळायचे आहेत. जर ते जिंकले तर संघ १० गुणांसह चौथ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत खेळू शकेल. दुसरीकडे बांगलादेश सहाव्या पराभवानंतर तळाला आहे.

जर त्यांनी उर्वरित सामने जिंकले तर बांगलादेशचे ६ गुण होऊ शकतात, तर टेबलमधील ४ संघांनी ८ गुण गाठले आहेत. अशा स्थितीत बांगलादेश बाहेर आहे. दरम्यान विश्वचषकाच्या ३० व्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला २०५ धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ४५.१ षटकांत सर्वबाद २०४ धावा केल्या. महमुदुल्लाह रियादने ७० चेंडूत ५६ धावा केल्या. लिटन दासने ६४ चेंडूत ४५ तर कर्णधार शाकिब अल हसनने ६४ चेंडूत ४३ धावा केल्या.

पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी आणि वसीम ज्युनियरने प्रत्येकी ३ बळी घेतले. हरिस रौफने २ बळी घेतले. इफ्तिखार अहमद आणि उसामा मीर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. पॉवरप्लेमध्ये खराब सुरुवातीनंतर लिटन दासने महमुदुल्लाह रियादसह बांगलादेशच्या विस्कळीत डावाचा ताबा घेतला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८९ चेंडूत ७९ धावांची भागीदारी केली. ३० षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या १२८/४ होती. संघाने ११ व्या ते ३० व्या षटकापर्यंत २० षटकांत एक गडी गमावून ९१ धावा केल्या. महमुदुल्लाह रियादने त्याच्या वनडे कारकिर्दीतील २८ वे अर्धशतक झळकावले. त्याने ७० चेंडूत ५६ धावांची खेळी खेळली. रियादने ८०.०० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. दरम्यान लिटन दास आणि महमुदुल्लाह यांच्यात चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली.

दोघांनी ८९ चेंडूत ७९ धावा जोडल्या. ही भागीदारी इफ्तिखार अहमदने लिटन दासची विकेट घेत तोडली. लिटन दास ४५ धावा करून बाद झाला. या सामन्यात बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांनी सतत दबाव कायम ठेवला. पॉवरप्लेमध्ये बांगलादेश संघाने तीन गडी गमावून केवळ ३७ धावा केल्या. तंजिद हसन शून्यावर होता. नजमुल हुसेन शांतो ४ धावा करून बाद झाला. या दोघांशिवाय मुशफिकर रहीमही ५ धावा करून बाद झाला. या विश्वचषकात पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. संघाने पहिल्या सामन्यात नेदरलँडचा ८१ धावांनी तर दुस-या सामन्यात श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला. पण, जसजशी स्पर्धा पुढे सरकत गेली, तसतशी संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होत गेली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR