23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीय१० दिवसांपूर्वी मंत्री, आता पराभव

१० दिवसांपूर्वी मंत्री, आता पराभव

जयपूर : राज्यस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे. करणपुर पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपचे सुरेंद्र पाल सिंह टीटी १२ व्या फेरीनंतर सात हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना मंत्रिपद दिले होते. त्यानंतर ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. पण आता त्यांच्यावर पराभवाचे सावट ओढावले आहे.

दरम्यान, राजस्थान निवडणुकीत प्रचारावेळी काँग्रेस उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीत सिंह कूनर यांचे निधन झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने करणपुर विधानसभा निवडणूक स्थगित केली होती. त्यानंतर तिथे निवडणूक पार पडली. भाजपने सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना रिंगणात उतरवले होते, तर काँग्रेसकडून कूनर यांचा मुलगा रूपिंदर सिंह याला तिकिट दिले होते. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या १२ फे-या पार पडल्या आहेत. १२ फे-यानंतर काँग्रेस उमेदवार रुपिंदर सिंह कूनर यांची आघाडी कायम आहे. त्यांनी आतापर्यंत ६४,००१ मते मिळाले आहेत. तर भाजप उमेदवार मंत्री सुरेंद्र पाल सिंह यांना ५६,५४६ इतकी मते मिळाली आहेत. ते ७४५५ मतांनी पिछाडीवर आहेत.

आमदार होण्याआधीच मंत्री
करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना ंिरगणात उतरवलं. पण त्याआधीच त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. आमदार होण्याआधीच सुरेंद्र सिंह टीटी हे मंत्री झाले होते. त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. यावरुन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला होता. सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना भाजपचे वरिष्ठ आणि अनुभवी नेता मानले जाते. १९९४ मध्ये ते मंत्रिमंडळात होते. राजस्थान वेयरहाउंिसगचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. वसुंधराजे सरकारमध्ये त्यांनी कृषिमंत्री म्हणून काम पाहिलेय. त्यानंतर २०१३-२०१८ यादरम्यान ते पेट्रोलियम मंत्री होते. आता भजनलाल सरकारमध्ये त्यांना आमदार होण्याआधीच मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR