24.9 C
Latur
Tuesday, July 1, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

पुणे : देशभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. जेएन.१या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकरने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.

मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR