28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडावर्ल्डकप ट्रॉफीवर मिचेल मार्शने ठेवले पाय

वर्ल्डकप ट्रॉफीवर मिचेल मार्शने ठेवले पाय

अहमदाबाद : रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक ंिजकला. ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एक असा फोटो आहे की ते पाहून सगळेच थक्क झाले. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मिचेल मार्श वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. हे पाहून सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन खेळाडूवर खूप टीका होत आहे.

मुख्य बाब म्हणजे मिचेल मार्शचा हा व्हायरल झालेला फोटो स्वत: ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर मार्शनेही तो फोटो रिपोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मार्शच्या पायाखाली वर्ल्डकप ट्रॉफी असून तो सोफ्यावर आरामात बसला आहे आणि त्याने ट्रॉफीवर पाय ठेवले आहेत. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला.

फोटो हॉटेलच्या खोलीतील दिसत आहे जिथे ऑस्ट्रेलियन संघ बसून एकमेकांशी निवांतपणे बोलत होते आणि त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये यजमान भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना झाला. या सामन्यात कांगारू संघाने भारतावर ६ विकेटसने विजय मिळवला.

पण मिचेल मार्शला या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रॉल केले जात आहे. सहाव्यांदा विश्वचषक जिंकल्यामुळे त्याची कदर नसल्याचे आणि वर्ल्डकप ट्रॉफीचा अनादर केला असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा फोटो शेअर केला जात आहे. अनेक यूजर्सने यावर प्रतिक्रिया देत त्यांनी मार्शवर टीका केली. अनेक युजर्सने हा विश्वचषक स्पर्धेचा अपमान असल्याचे लिहिले, तर काहींनी ही ट्रॉफी त्यांची आहे, त्यांना हवे ते करावे असे लिहिले. यासोबतच भारताच्या सचिन तेंडुलकरने ट्रॉफीला उचलून धरलेला फोटो पोस्ट करतही काही जणांनी ट्विट केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR