24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरआधुनिक नक्षीदार पणत्यांना सर्वाधिक मागणी

आधुनिक नक्षीदार पणत्यांना सर्वाधिक मागणी

लातूर : प्रतिनिधी
दीपावली आता सुरु होत असल्याने बाजारपेठेत विविध खरेदीसाठी महीलानी एकच गर्दी केली आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणा-या दिव्यांच्या असंख्य प्रकारांनी पणत्यानी शहरातील बाजारपेठ सजली आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी पारंपरिक दिव्यांबरोबरच आधुनिक एथनिक टच दिलेल्या शेकडो प्रकारच्या पणत्या व दिवे बाजारपेठेत दाखल झाले आहेत.

स्वस्तिक, पाने, फुले, चांदण्या अशा वैविध्यपूर्ण आकारातील पणत्यांसह कुंदन प्रकरातील कलाकुसर केलेल्या आणि नक्षीदार पणत्या बाजारपेठेत महिलांसाठी आकर्षण ठरत आहेत. दिवाळीमध्ये सर्वाधिक महत्त्व दिले जाते ते पणत्यांना. खरे तर वसुबारसेपासूनच दिवाळी या दीपोत्सवाला सुरुवात होते, आणि बघता बघता या पणत्यांमुळे घराचे अंगण प्रकाशाने उजळून जाते. मंगलमय वातावरणात रंग भरणा-या दिव्यांमध्ये गतवर्षीप्रमाने नवनवीन प्रकार बघायला मिळतात. काही वर्षांपूर्वी कुंभारवाडयात एकाच साच्यातून तयार होणा-या पारंपरिक पणत्याच बाजारपेठेत पाहायला मिळत होत्या. मात्र हळूहळू मेणाच्या, काचेच्या पणत्यांचा यात भर पडली आहे. कालांतराने कारागिरांनी विविध प्रकारच्या नक्षीदार पणत्या करायला सुरुवात केली. या पणत्यांनाही ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर कुंदन, मोती आदी गोष्टींनी सजवलेल्या पणत्याही बाजारात उपलब्ध झाल्या. या पणत्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे किरकोळ व्यापारी पारबती भागवत राजे यांनी सागीतले.

बाजारपेठेत या वर्षी स्वस्तिक, फुले, पाने, चांदण्या, नक्षीकाम केलेल्या रंगीत आणि साध्या मातीच्या पणत्या उपलब्ध आहेत. शहरात विक्रिसाठी येणा-या पणत्या राज्यस्थान, मुंबई, गुजरात, अहमदाबाद, सोलापुर येथून हा सर्व माल मागवला गेला असल्याचे होलसेल व्यापारी राम कुभार योनी सागीतले. शहरातील विविध ठिकानी रसत्याच्या साईडला पणत्या विक्रित्यानी आपले स्टॉल लावले आहेत. या स्टॉलवर ३० रुपये ते ८० रुपयांना एक डझन अशी या पणत्यांची विक्री केली जात आहे. विविध नकक्षापासून बनवलेल्या या पणत्याना नागरीकानी अधिक पसंधी दिल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR