29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयमुलांची काळजी आईच चांगली घेऊ शकते

मुलांची काळजी आईच चांगली घेऊ शकते

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची योग्य काळजी फक्त आईच घेऊ शकते. त्यामुळे पती-पत्नी वेगळे झाल्यास अशा मुलांचा ताबा पत्नीला मिळायला हवा.

न्यायमूर्ती आर. सुब्रमण्यम आणि डी. नागार्जुन यांच्या खंडपीठाने ८ वर्षांच्या मुलीच्या ताब्याशी संबंधित प्रकरणावर सांगितले की, वडील गेल्या एक वर्षापासून आपल्या मुलीशिवाय अमेरिकेत आनंदाने राहत आहेत. त्यांनी मुलीला तिच्या वृद्ध आई-वडिलांकडे मुंबईत सोडले होते. त्यामुळे तिने आईसोबत राहावे हेच मुलाच्या हिताचे आहे. ४ आठवड्यांत मुलाचा ताबा आईकडे सोपविण्याचे आदेश न्यायालयाने वडिलांना दिले आहेत.

स्टॅलिन सॅम्युअल आणि ग्रेसी सिल्व्हिया यांचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. लग्नानंतर दोघेही काही दिवस मुंबईत राहिले. नंतर अमेरिकेला गेले. २०१५ मध्ये या जोडप्याला मुलगी झाली. पुढे दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर वडिलांना मुलीचा ताबा मिळाला. मात्र, वडील मुलीला आई-वडिलांकडे मुंबईत सोडून अमेरिकेला गेले. २०२२ मध्ये, सालेममधील कौटुंबिक न्यायालयाने ग्रेसीला मुलीचा ताबा देण्याचा आदेश दिला. स्टॅलिन यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR