21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeराष्ट्रीयकॅश फॉर क्वेरीचे आरोप खोटे

कॅश फॉर क्वेरीचे आरोप खोटे

अदानी विरोधात बोलले तर दर्शन यांना पैसे देईन चोरी, वरून शिरजोरी भाजपचा टोला

नवी दिल्ली : कॅश फॉर क्­वेरी प्रकरणी महुआ मोइत्रांचा खटला संसदेच्या एथिक्स कमिटीसमोर सुरू आहे. समितीने महुआंना २ नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, भाजप आणि महुआंमध्ये शब्दयुद्ध सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांत महुआंनी दोन वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या, ज्यामध्ये त्यांनी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून भेटवस्तू आणि मदत मिळाल्याचे कबूल केले. दर्शन यांच्याकडे त्यांचा आयडी-पासवर्ड असल्याचेही त्यांनी कबूल केले. महुआंनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे. कॅश फॉर क्वेरीचे भाजपचे आरोप खोटे आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. जर दर्शन आता अदानी विरोधात बोलले तर मी त्यांना लाच द्यायला तयार आहे असेही महुआंनी म्हटले आहे.टीएमसी खासदाराच्या या वक्तव्यावर भाजपचे शहजाद पूनावाला यांनी टोमणा मारला असून एक तर चोरी वरुन शिरजोरी असल्याचे म्हटले आहे. महुआ सर्वांना मूर्ख समजतात, तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा.

मी दर्शन यांचे पैसे घेतले नाहीत
भाजपचे आरोप फेटाळून लावत महुआ म्हणाल्या होते की, त्यांनी दर्शन यांचे कोणतेही पैसे घेतले नाहीत. दर्शन हिरानंदानींनी ज्या संसदेच्या साइटवर महुआंच्या आयडीने लॉग इन केले होते ते गुपित नाही. प्रत्येक खासदाराच्या टीममधील १० लोक त्याचा वापर करतात. टीएमसी खासदार म्हणाल्या की, अदानींविरोधात बोलण्यासाठी त्यांना पैशांची गरज नाही, कारण त्या स्वत: यावर प्रश्न विचारत आहेत. खरे तर दर्शन अदानींविरोधात बोलले तर ते त्यांना पैसे द्यायला तयार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR