26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत पाटील यांनी दिला राजीनामा

मराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत पाटील यांनी दिला राजीनामा

हिंगोली : मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला.

मराठा समाजातील आरक्षणाची मागणी केंद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वत:च्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR