27.5 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमनोरंजन‘धर्मवीर २’ वरून खासदार राऊतांची शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका

‘धर्मवीर २’ वरून खासदार राऊतांची शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका

मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ हा चित्रपट आज (२७ सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दिघेनां भाजपच्या मदतीने बाळासाहेब ठाकरेंच्याही वर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कारण बाळासाहेब ठाकरेंचे महाराष्ट्रातील कोट्यवधी समर्थक एकनाथ शिंदेंना मानत नाहीत.त्यामुळे अशा चित्रपटाच्या माध्यमातून एक नवे प्रतिक निर्माण करायचा हा प्रयत्न केला जात आहे, अशी ठीका राऊत यांनी केली. धर्मवीर आनंद दिघे काय होते, त्यांची व्याप्ती काय होती, हे आम्हाला माहीत आहे. ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना माहीत नाही.असा टोला ही खासदार राऊतांनी शिंदे-फडणवींसांना लगावला.

धर्मवीर २ सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग काल मोठ्या दिमाखात पार पडले. या चित्रपटाच्या प्रीमिअरला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. धर्मवीर-२ या सिनेमातून आनंद दिघे यांच्या मृत्यूपासून ते एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंतचा पट उलगडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर शिवसेनेचे खरे वारसदार राज ठाकरेच असल्याचे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

यावर खासदार राऊतांना माध्यतांनी विचारले असता त म्हणाले, आनंद दिघे हे शिवसेनेचे ठाण्याचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी होते. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी ते सतत पुढे असायचे. शिंदेपेंक्षा राजन विचारे आणि इतर अनेक लोक होते, जे दिघे साहेबांच्या फार जवळ होते. त्यामुळे धर्मवीरावर काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखं जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला सिनेमे काढून स्वत:चा डंका पिटवण्याची वेळ आली नसती. असा टोला ही राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

धर्मवीर २ चित्रपटात काय आहे?
धर्मवीर २ मध्ये राज ठाकरे हेच शिवसेनेचे खरे वारसदार होते, असा एकनाथ शिंदे यांचा आनंद दिघे यांच्याशी एक संवाद आहे. आनंद दिघे हे कारसेवेसाठी अयोध्येला गेल्याचे दाखवण्यात आले आहे. यासोबतच दिघे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या चित्रपटाची सुरुवातच पालघर साधू हत्याकांडामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाल्याच्या प्रसंगाने होते. एकीकडे साधुंची हत्या आणि सरकारमध्ये असूनही काही न करता येण्याची शिंदेची हतबलता यात दाखवण्यात आली आहे. यासोबतच २०१९ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने आमदारांची होणारी कुचंबना, हिंदुत्वाचा होणारा अपमान, आदी प्रसंगही सिनेमात आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR