राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला पावणे दोन कोटींचा माल जप्त

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यांतून सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्यहातभट्टी दारू विक्री केली जाते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये अवैध हातभट्टी दारू, देशी-विदेशी मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच अवैध मद्य विक्री करणाऱ्या डांब्यावर केलेल्या कारवाईत एक कोटी ७७ लाख ७१ हजार ४१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक,आंध्र प्रदेश यासह विविध राज्यांतून बनावट, देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. अवैध मद्य विक्री करणान्या १४ वाल्यांवर ही कारवाई करून ३७३ गुन्हे दाखल केले. ३५९ जणांवरही कारवाई केली. या कारवाईत एक लाख ११ हजार ५८० लीटर गुळमिश्रीत रसायन, ९ हजार ५२९ लीटर हातभट्टी दारू१ हजार ८७१ लीटर ताडी, १ हजार ७७५ लीटर देशी दारू८२६ लिटर विदेशी मद्य, बनावट विदेशी मद्य ८७ लीटर२८३ बिअर७३ बाहनासह एकुण एक कोटी ७७ लाख ७९ हजार ४१९ इतका मुद्देमाल जप्त केला.

अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा होटगी रोड, जयभवानी ढाबा मंगळवेढा रोड, सावजी कोल्ड्रींक्स, कन्ना चौक तसेच पंढरपूर कासेगाव येथील साईराजे, महाराजा ढाबा तारापूर माढा येथील राणा ढाबा,माळशिरस येथील सावन ढाबा, शिवनेरी टाकळी सिंकदर ता. मोहोळ, हॉटेल सावली भोगाव ता. उत्तर सोलापूर, शुभम ढाबा सांगोला ता. सांगोला, बेलाटी येथील जय भवानी ढाबा या १४ ढाब्यांवर कारवाई केली. ब्रॉथ अ‍ॅनलायझरचा वापर करून वैद्यकीय चाचणी नंतर १४ ढाबा मालक व ३५ मद्यपी ग्राहकांना न्यायालयासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी २५ हजार रूपये, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा दिली. चार लाख ३० हजार रुपये दंड जमा केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन. पाटील, अ. व्ही. घाटगे, पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक एस. डी. कांबळे, आर. एम. कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, वाहनचालक रशीद शेख, दीपक वाघमारे यांनी ही कारवाई पार पडली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने निवडणुकीच्या काळात मोठी कारवाई केली. पावणे दोन कोटीचा दंड वसूल केला. यापुढेही कारवाई सुरू राहील, परवाना नसणाऱ्या ठिकाणी मद्य प्रशान केल्याने संबंधित जागा मालक व मद्यपींवर कारवाई होईल. अवैध दारू विक्री, वाहतूक होत असल्यास उत्पादन विभागाशी संपर्क साधावा असे राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगीतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news