33.3 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये जाळपोळ करणा-या गुंडावर एमपीडीए कारवाई

बीडमध्ये जाळपोळ करणा-या गुंडावर एमपीडीए कारवाई

बीड : बीड शहरासह तालुक्यात दहशत माजविणा-या गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणातील जाळपोळीतही याच गुंडाचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर दंगा करण्यासह इतर गंभीर स्वरूपाचे सह गुन्हे दाखल आहेत. हाच धागा पकडून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गुरूवारी ही कारवाई केली.

समाधान बाबुराव खिंडकर (वय २८ रा.बेलवाडी ता.जि. बीड) असे या गुंडाचे नाव आहे. या गुंडाविरोधात खूनाचा प्रयत्न करणे, जाळपोळ करणे, दंगा करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे, दरोडा टाकणे, गैर कायद्याची मंडळी जमवणे, रस्ता अडवणे, घराविषयी आगळीक करणे, सरकारी कर्मचा-यांना दुखापत करणे असे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR