22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली

मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली

२०० एक्यूआयचा स्तर ओलांडला

मुंबई : प्रतिनिधी
दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच दिल्लीत मोठ्या प्रमाणात होणा-या वायू प्रदूषणावर चिंता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता मुंबईतही हवेचा स्तर खराब झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील अनेक भागातील हवेच्या गुणवत्तेने २०० एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) ओलांडला असून ही चिंतेची बाब ठरत आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणासाठी वाहने, सततची बांधकामे आणि कंपन्याच जबाबदार असून त्यासह तापमानात होणारी घट आणि त्यामुळे प्रदूषणाचे कण वातावरणात कायम राहत असल्याचेही कारण सांगण्यात आले.
शहरात धुकेही दिसत आहे. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणा-या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एफ समीर यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी मुंबईतील हवेची सरासरी गुणवत्ता १९० एक्यूआय नोंदवली गेली. इतक्या प्रमाणात नोंदवली गेलेली गुणवत्ता आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, १०० किंवा त्यापेक्षा कमी एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) समाधानकारक मानला जातो. मात्र, १०० किंवा त्याहून अधिक एक्यूआय धोकादायक असल्याचे मानले जाते.

मुंबईतील या भागात सर्वात खराब हवा
मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी हवेचा स्तर सर्वाधिक २८४ एक्यूआय नोंदवला गेला. त्याशिवाय चेंबूरमध्ये २५५, बीकेसीमध्ये २३४ आणि शिवडी येथे हवेची गुणवत्ता २२६ इतकी नोंदवण्यात आली. याशिवाय इतर सर्व ठिकाणी हवेची गुणवत्ता पातळी जवळपास १०० ते २०० एक्यूआय दरम्यान इतकी होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR