बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दिघोळ आंबा गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक पांडुरंग सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला म्हणून पांडुरंगने आपले जीवन संपविले असल्याचे जवळच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे रिंगणात होते. नुकताच बीड लोकसभेचा निकाल हाती आला या निकालात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. दरम्यान त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये बरीच नाराजी पाहायला मिळाली.