29.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभेआधी माझा केजरीवाल करणाार आहेत

विधानसभेआधी माझा केजरीवाल करणाार आहेत

काटेवाडी : मी जर त्यांच्याकडे गेलो असतो तर एवढ्या कमी वयात मलाही मंत्रीपद मिळाली असते. तसेच त्यांच्याकडे मी गेलो असतो तर माझ्यावर ईडीची कारवाई झाली नसती. मात्र मी पवार साहेबांच्या सोबत राहिलो. विचाराच्या सोबत राहिलो.

मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला.काटेवाडी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त आमदार रोहित पवार यांनी सोमवारी ( ता. २९) कोपरा सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विरोधकांच्या मलिदा गँग मधील कार्यकर्ते असे म्हणतात की या गावातील बूथचे मतदान सुप्रिया ताईंना प्लस मध्ये झाले तर आम्ही तुमच्याकडे बघतोच. परंतु मी तुम्हाला सांगतो हे काहीही करू शकणार नाहीत. लोकसभेचे मतदान झाल्यानंतर पुढील सहा महिन्यातच यांना विधानसभेसाठी पुन्हा तुमच्याकडे यायचे आहे. त्यामुळे वीज बंद करीन पाणी बंद करील अशा ज्या धमक्या देत आहेत यापैकी ते काहीही करणार नाहीत.

मागील साठ वर्ष ज्या विचाराच्या पाठीमागे आपण आहोत त्याच विचाराच्या मागे उभे राहायचे आहे. आपले कुटुंब कुणी फोडत असेल तर त्याचा बदला घ्यायचा. तुम्हाला पदे साहेबांमुळे मिळाली. व त्या पदांच्या जोरावरच तुम्ही विकास निधी मतदार संघामध्ये आणला आणि आता तेच नेते सांगतात विकास निधी मी आणला म्हणून मात्र साहेबांमुळे पदे मिळाली म्हणून तुम्हाला विकास निधी आणतात हे मात्र विसरता. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कन्हेरीच्या प्रचार सभेमध्ये मंगलदास बादल नावाचा माणूस आला होता. त्याच्या भाषणाची क्वॉलिटी बघा. मी जर तिथे असतो तर त्याच्या कानाखाली लावली असती. यावर उपस्थितानी देखील त्याला खरेच मारायला हवे होते. आपल्या गावातील देखील बरीच माणसे तिथे होती. वरच्या राजकारणाबद्दल काही बोल पण साहेबांच्या बद्दल बोलायचे नाही असे त्याला सांगायला हवे होते, चोर तो चोर वर शिरजोर, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. यावर रोहित पवार म्हणाले, मी ज्या अजित पवारांचा फॅन होतो ते पूर्वीचे ओरिजनल अजित पवार असते तर त्यांनी त्याला तिथेच ठोकला असता. मात्र दादांनी काय केले तर डोके खाली घातले. हे योग्य आहे का? ज्या गोष्टी तुम्हाला बोलता येत नाहीत त्या अशा भाडेकरूंच्या माध्यमातून तुम्ही बोलता आणि ते आम्हाला कळणार नाही का? असाही सवाल यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR