28.5 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा

फडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असून, भाजपला मोठे यश मिळाल्याने आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, असा सूर भाजपमधून उमटू लागला आहे. आता फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भाजप आणि महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी बसावे, अशी फक्त भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्याच भूमिकेत असल्याची माहिती पुढे आली आहे. कारण देवेंद्र फडणवीस स्वत: संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. नेहमीच त्यांनी राजकीय आचरणातही संघाच्या शिस्तीचे पालन केले आहे.

राजकीय नफ्या-तोट्यासाठी त्यांनी कधीही स्वत: संघाचा स्वयंसेवक असल्याचे लपविले नाही. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने संघाच्या सर्वच पातळ््यांवर त्यांचा थेट डायलॉग नेहमीच राहिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कडवट हिंदुत्वाचा मुद्दा फडणवीसांपेक्षा जास्त जोरात महायुतीच्या इतर कुठल्याही नेत्याने उचलला नाही.

संघाच्या सर्वच कामांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी होतात.. कधीही राजकीय नफ्यासाठी त्यांनी स्वत:ला संघापासून वेगळे सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या नावाला अनुकूलता दर्शविली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR