त्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

नांदेड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आयटीआय चौकात बुधवारी सकाळी झालेल्या आंदोलनात, संबधितांनी माफी मागावी अन्यथा नांदेडसह राज्यात फिरू देणार नाही असा इशारा आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादीच्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात घोषणाबाजी करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी,अन्यथा त्यांना नांदेडमध्ये अथवा राज्यामध्ये फिरू देणार नाही. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर नेत्यांनी अपमानास्पद वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी नांदेड महानगराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर,उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, सुनील नानवटे, मोहम्मद खान पठाण, शिरीष गोरठेकर, मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास गोरठेकर,उत्तमराव सोनकांबळे, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदाताई जोगदंड,डॉ. मीनाक्षी कागडे,अ‍ॅड.एजाज,युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे,लोहा तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी,धमार्बाद तालुकाध्यक्ष दीपक पाटील कदम,बाबुराव पाटील कदम,नारायण पाटील पवार, देगलूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार,देगलूर शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार,नगरसेवक स्वप्निल लुंगारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news