26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeधाराशिवराष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांचा राजीनामा

उमरगा : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना उमेदवारी डावलल्याने उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांनी गुरुवारी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रा. बिराजदार यांना उमेदवारी दिली नसल्याचा निषेध नोंदवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात जाफरी यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. सुरेश बिराजदार यांना मागील सहा महिन्यापूर्वी धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून घेणार असल्याचे सांगुन निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा अशी सूचना केली होती.

त्या दृष्टीने प्रा. बिराजदार संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. उमेदवारी निश्चित असताना ऐनवेळी शेवटच्या क्षणात दुस-या पक्षातील व्यक्तीला पक्ष प्रवेश करून संधी देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून प्रा. बिराजदार जिल्ह्यातील गावागावात जाऊन पक्षाचा झेंडा पोंचवला आहे, मात्र त्यांच्या सारख्या निष्ठावान नेत्यांना डावलले जाते, ही बाब निषेधार्थ आहे असे सांगत जाफरी यांनी एक व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR