16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विधानपरिषदेकडून नोटीसा

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विधानपरिषदेकडून नोटीसा

नागपूर : शिवसेने सोबतच राष्ट्रवादी कोणाची? असा वाद आता राज्यात रंगला आहे. या दोन्ही गटांची कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (८ डिसेंबर) विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांनी केलेल्या दाखल केलेल्या याचिकेनंतर या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती झटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

शरद पवार गटाच्या जितेंद्र आवड यांच्या याचिकेवरून रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून दाखल याचिकेत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या नावाचा समावेश आहे. दोन्ही गटांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांमध्ये आपले उत्तर सादर करण्याचा आदेश या नोटीसमधून देण्यात आला आहे.

तसेच विधान परिषद सदस्य नियम १९८६ अंतर्गत आपले म्हणणे लेखी स्वरुपात सात दिवसात देण्याचे उपसभापती यांनी विधानसभा परिषद सदस्यांना निर्देश दिले आहेत. सात दिवसांमध्ये उत्तर न आल्यास आपले याबाबत काहीच म्हणणे नसल्याचे गृहित धरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असाही नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR