त्रिशा कृष्णनवर अश्लील टिप्पणी: माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर पोलिसांची कारवाई

चेन्नई : वृत्तसंस्था
अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल अश्लील टिप्पणी करणे माजी उपमुख्यमंत्र्यांना चांगलेच भोवले आहे. त्यांना चेन्नई इथल्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. तंजावरमधल्या सभेत त्यांनी थलपती विजय यांच्यावर निशाणा साधत असताना त्रिशाबद्दल दुहेरी अर्थाची टिप्पणी केली होती.

अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी करणारे तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तंजावरमध्ये कावेरी पाणी तंटासंदर्भात झालेल्या सभेत उदयनिधी यांनी त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना चेन्नईमधल्या नीलंकराई इथल्या त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. सहपोलिस आयुक्त डॉ. पी. विजयकुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने उदयनिधी यांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी पोलिस वाहनातून नेले.

या प्रकरणात अटकेची शक्यता वाटल्याने उदयनिधी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्रिशाबद्दलच्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर टीव्हीकेकडून उदयनिधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

उदयनिधी स्टॅलिन हे तंजावरमध्ये कावेरी पाणीप्रश्नाशी संबंधित आंदोलनाचे नेतृत्व करत होते. यावेळी सभेला संबोधित करताना स्टॅलिन यांनी थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. कावेरी पाणी प्रश्नाबद्दल उदयनिधी म्हणाले, ‘आमचे मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर तोंड उघडत नाहीत. त्यांना आमच्या पक्षावर खोटे खटले दाखल करण्याची जास्त चिंता आहे.’ यावेळी गर्दीतून काही जणांनी ‘त्रिशा, त्रिशा..’ अशी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा उदयनिधी क्षणभर थांबले, हसले आणि मग टिप्पणी केली की, पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथे मात्र पोहोचायला हवे. मला कावेरी म्हणायचे होते. हे ऐकताच लोकांनी जोरजोरात हसत टाळ्या वाजवल्या.
या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत टीव्हीकेने उदयनिधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे तंजावर पोलिसांनी उदयनिधी यांच्याविरोधात गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदी आणि तामिळनाडू महिला छळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवला. उदयनिधी यांची टिप्पणी अश्लील असल्याचा आरोप करत टीव्हीकेने राष्ट्रीय महिला आयोगाकडेही धाव घेतली आहे. पक्षाने राष्ट्रीय महिला आयोगाला उदयनिधी यांच्या भाषणाचे व्हीडीओ फुटेज तपासून त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्याचे आवाहन केले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांचे नाव अनेकदा अभिनेत्री त्रिशा कृष्णनशी जोडले जाते. विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशाच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news