27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे, नाशिकमध्ये अवकाळी द्राक्षबागांसह भाजीपाला, रबी पिकांची हानी

पुणे, नाशिकमध्ये अवकाळी द्राक्षबागांसह भाजीपाला, रबी पिकांची हानी

पुणे : प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. विशेषत: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड तर नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यासोबतच नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने रबी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच नाशिकच्या ग्रामीण भागातही गारपिटीसह पाऊस झाला.

पूर्वेकडून येणा-या बाष्पयुक्त वा-यांचा पश्चिमेकडून येणा-या वा-यांशी संयोग होऊन कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांत २७ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
येत्या तीन तासांत देखील काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार सरी कोसळण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासोबत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे यासह मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, जालना तर विदर्भात बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

नाशिकमध्ये कांदा, फळबागांचे नुकसान
नाशिक जिल्ह्यातील कसबे, मौजे सुकेने आणि परिसरात बिगर मोसमी पाऊस कोसळला. सुकेने परिसरात गारांचा वर्षात झाला. यासह सिन्नर परिसरातदेखील पाऊस कोसळत आहे. सुकेने, सिन्नरसह चांदोरी परिसरामध्येही गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात फळबागा, कांद्याचे नुकसान झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR